NSK26H34429
जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या बैठकीत बोलताना अध्यक्ष प्रमोद पाटील. व्यासपीठावर मान्यवर.
---
महाविकास आघाडी मित्रपक्षासोबतच
---
राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या बैठकीत निर्णय
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ३ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक महाविकास आघाडी मित्र पक्षासोबतच लढवेल. त्यात तडजोड होणार नाही, असा राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी प्रत्येक जिल्हात बैठक घ्यावी, अशा पक्षाच्या आदेशानुसार जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची बैठक झाली. निरीक्षक भास्करराव काळे अध्यक्षस्थानी होते. जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील उपस्थित होते. बैठकीत संघटनात्मक बाबींसह जिल्हात पडलेल्या दुष्काळावर उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाली. ‘एसआयआरबाबतही चर्चा करण्यात आली. पुढील काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली.
ॲड. रवींद्र पाटील, अशोक लाडवंजारी, अयाज मलिक, प्रा. दिलीप खोडपे, विलास पाटील, अभिषेक देशमुख, किशोर पाटील, उमेश पाटील, डी. एम. पाटील, दिनकर पाटील, कल्पिता पाटील, श्री. महाजन, श्री. महाडीक, राजू मोरे, संग्रामसिंह सूर्यवंशी, सुनील माळी, किरण राजपूत, मझहर पठाण, उत्तम शिंदे, अमोल कोल्हे, ललित नारखेडे, सुहास चौधरी, विनायक पाटील, गिरीश सांगळे आदी उपस्थित होते.