Nashik : पितृछत्र हरपलेल्या मोहिनीला मिळाली शाळेची ऊब!

Municipal President Bharat Waghmare presents new clothes and sweets to Mohini and her mother and grandmother on the occasion of Diwali.
Municipal President Bharat Waghmare presents new clothes and sweets to Mohini and her mother and grandmother on the occasion of Diwali.esakal

पळसन (जि. नाशिक) : आईवडिल गुजरातच्या कच्छ भागातील, गाईम्हशींमुळे सतत स्थलांतर करत असल्याने एक ठिकाण निश्‍चित नसे. अशातच कोरोना काळात सुरगाण्याकडे आलेले असताना वडिलांना कोरोना झाला, त्यामुळे ते तिकडे निघून गेले अन तिथेच त्यांचे निधन झाले. चिमुकली मोहिनी आई, आजीसह सुरगाण्यातच निराधार जगू लागली.

तिला शाळेत घालण्यासाठी ना वडिलांचा दाखला ना तिचा दाखला होता, त्यामुळे ती शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर राहणार होती. सुरगाणा जिल्हा परिषद सालेतील शिक्षक रतन चौधरी यांनी प्रयत्न करून तिच्या आईचे नाव पालक म्हणून लावून घेतले अन चिमुरडी मोहिनी सरस्वतीच्या प्रांगणात बागडू लागली. तिच्या बारावीपर्यतच्या शिक्षणाचा खर्चही त्यांनी स्वतःकडे घेत तिचे शैक्षणिक पालकत्व घेतले. दिवाळीनिमित्त तिच्यासह आई, आजीला गोडधोड अन कपडे देत त्यांचीही दिवाळी गोड केली. (Ratan Choudhary teacher of Surgana ZP School help poor child mohini bhalerao as guardian for further education nashik news)

जिल्हा परिषद शाळा सुरगाणा क्रमांक दोनमधील मोहिनी नलीबाई भालेराव असे तिचे नाव आता हजेरी पटावर लागले आहे. शिक्षकांनी तिच्याबद्दल सर्व मुलांना समजावून सांगत आईचे नाव का हे सांगितले, मुळे आता सर्व मुलेमुली तिच्याशी आनंदाने समरस होतात. दर्श पुरस्कारप्राप्त शिक्षक रतन चौधरी यांच्या पुढाकारामुळे हे सारे घडून आले असून एका निराधार मुलीला शैक्षणिक छत्र मिळाले आहे. समाजातील मान्यवरांनी आणि दात्यांनी पुढे येत तिला घरकुल उभारून द्यावे अशी भावना अनेकांनी बोलून दाखविली.

मोहिनी अभ्यासात हुशार व होतकरू आहे. तिचे वडील कच्छ भूज काठियावाडी या भागातील रहिवासी होते. आईकडे मुलीच्या वडिलांच्या कागदपत्राचा कोणत्याही प्रकारचा पुरावा नसल्याने अखेर आईने स्वतःचे नाव शालेय दप्तरी लावत मुलीला शाळेत दाखल केले. मुलीला भविष्यात शिक्षणासाठी कागदपत्रांची अडचण होऊ नये यासाठी मी तिच्या नावापुढे माझे नाव लावले आहे असे आईने सांगितले. तिचे वडील गुरे चारता चारता ती आता शाळेत जाऊ लागली आहे.

सध्या ती व तिची आई निराधार वृद्ध आजीकडे एका कुडाच्या, कारवीच्या भिंती असलेल्या झोपडीत वास्तव्य करतात. त्यांच्याकडे सध्या एक अर्धा लिटर दूध देणारी देशी गाय आहे. दहा चौरस फूट जागेत तिन्ही मायलेकी राहतात. मुलीला छोटेखानी का असेना एखादे घरकुल मिळावे यासाठी समाजातील स्वयंसेवी संस्था व दातृत्वाचे हात पुढे येण्याची आवश्यकता आहे. मोहिनी सकाळी उठल्यावर गायीला चारायला माळरानावर घेऊन जाते. नित्य नियमाने न चुकता शाळेत येते. तिची आई धुणी-भांडी करीत निराधार आई व मुलीचा उदरनिर्वाह करीत आहे.

Municipal President Bharat Waghmare presents new clothes and sweets to Mohini and her mother and grandmother on the occasion of Diwali.
Diwali Shopping : यंदाचा दिवाळी सण दणक्यात; वाहनबाजार, होमअप्लायन्सेस, ज्वेलरीत बूम

प्रभारी मुख्याध्यापक रतन चौधरी यांनी दत्तक पालक योजनेंतर्गत इयत्ता बारावीपर्यंत शिक्षणासाठी दत्तक घेतले असून तिचा शालेय शैक्षणिक खर्च चौधरी करीत आहेत. लेखन साहित्य, शालेय दप्तर ते मुलीला घेऊन देत आहेत. तिचीही दिवाळी गोड व्हावी या हेतूने कपडे, खाऊ, मेकअप, साज श्रृंगार साहित्य दिवाळी भेट म्हणून सुरगाणा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष भरत वाघमारे यांच्या हस्ते देण्यात आले. नाशिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक भास्कर बागूल, आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटनेचे तालुका सरचिटणीस तुकाराम भोये, कार्याध्यक्ष कृष्णा देशमुख आदी उपस्थित होते.

"शासनातर्फे निराधार, अनाथ मुलींसाठी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना राबविण्यात येत आहे. त्याचा लाभ अशा होतकरू, हुशार मुलींना मिळत आहे. मात्र आपल्याच शाळेतील एखाद्या गरीब, निराधार, अनाथ मुलीचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारुन मदत केल्याचा आनंद वेगळाच असतो. इतरांनीही आपल्या शाळेतील अशा मुलांना आधार द्यावा."
- रतन चौधरी, राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक, सुरगाणा.

Municipal President Bharat Waghmare presents new clothes and sweets to Mohini and her mother and grandmother on the occasion of Diwali.
Diwali Faral : महागाईने फराळाचा गोडवा कमी!; तयार वस्तूंना मागणी कायम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com