नाशिक- राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत लाखो लाभार्थींना महिन्याकाठी मोफत धान्य वितरण करणारे स्वस्त धान्य दुकानदार तीन महिन्यांपासून ‘कमिशन’च्या प्रतीक्षेत आहेत. शासनाकडे साधारणत: नऊ कोटी रुपयांचे अनुदान थकीत असल्याने दुकानदारांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.