Latest Marathi News | शिवारपाडाच्या राऊत कुटूंबात 7 जणांना अन्नातून विषबाधा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

food poisoning news

Nashik : शिवारपाडाच्या राऊत कुटूंबात 7 जणांना अन्नातून विषबाधा

दिंडोरी (जि. नाशिक) : तालुक्यातील एका गावात कुटुंबातील तब्बल सात सदस्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात सर्वत्र घबराटीचे वातावरण पसरले आहे. आरोग्य विभागामार्फत विषबाधा झालेल्या रुग्णावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले आहे. (Raut family of Shivarpada 7 people got food poisoning Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: Police Bharati : वर्षामागून वर्षे निघून चालली, संधी केव्हा?

दिंडोरी तालुक्यातील शिवारपाडा येथे एकाच कुटुंबातील सात सदस्यांना जेवणातून विषबाधा झाली. सर्वांना ननाशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू करण्यात आले आहेत. शिवारपाडा येथे राऊत कुटुंबियांच्या दुपारी जेवणात भाकर व इतर पदार्थ होत, त्यानंतर सातही व्यक्तींना जुलाब, वांत्या, जळजळचा त्रास सुरू झाला. नानाशी आरोग्य केंद्रात डॉ. प्रशांत जोशी व इतरांनी उपचार केले.

सध्या सुनील देवराम राऊत, विठ्ठल राऊत, राधा राऊत, नंदा राऊत, काशिनाथ राऊत, चंद्रकला राऊत यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहे. अन्न पदार्थाचे नमुने घेण्यात आले असून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी ननाशी आरोग्य केंद्रात भेट देऊन रूग्णांची प्रकृतीची विचारपूस केली. या घटनेनंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

हेही वाचा: Horse Funeral : बळीराजाची अशीही कृतज्ञता; कवडदरात होणार घोड्याची दशक्रिया