NSK26H33150
जळगाव रावणदहन करताना आमदार सुरेश भोळे. शेजारी उपमहापौर मनोज चौधरी, पीयूष कोल्हे आदी.
---
NSK26H33148
रावणदहनाचे दृश्य.
----
मेहरुण तलावावर ५१ फुटी रावणाचे दहन
एल. के. फाउंडेशनतर्फे आयोजन; मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २० : विजयादशमीनिमित्त मेहरुण तलाव परिसरात एल. के. फाउंडेशनतर्फे ५१ फुटी रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक मर्यादा असतानाही वर्षानुवर्षे सुरू असलेली परंपरा अखंडित ठेवण्याच्या उद्देशाने यंदाही रावण दहनाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून वाईट प्रवृत्तींवर चांगुलपणाचा विजय हा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाला आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, पीयूष कोल्हे, उपमहापौर मनोज चौधरी, नगरसेवक नितीन बरडे, गणेश सोनवणे, प्रवीण कोल्हे, नरेंद्र पाटील यांच्यासह नीलेश तायडे, प्रफुल्ल देवकर आणि सुनील पाटील उपस्थित होते. ॲड. सुनील पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
चौकट
परंपरेचे सातत्य कायम
मेहरुण तलाव परिसरातील रावण दहन हा जळगावमधील विजयादशमी उत्सवातील महत्त्वाचा उपक्रम मानला जातो. दरवर्षी रावणाची भव्य प्रतिकृती उभारून तिचे दहन केले जाते. यंदाही ५१ फुटी रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करून एल. के. फाउंडेशनने परंपरेचे सातत्य राखले.
दुष्काळी परिस्थिती असतानाही सांस्कृतिक परंपरा जपण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. रावण दहन पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.