धुळे ः टुडे १ साठी, मेन
--
रावेर एमआयडीसीला २८९ हेक्टर जमीन हस्तांतरित
-
मंत्रिमंडळाची मंजुरी : रावल, अग्रवाल यांच्या पाठपुराव्याने औद्योगिक विकासाला गती
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २७ : येथील अवधान शिवारातील ‘एमआयडीसी’चे गेल्या दीड ते दोन दशकांपासून विस्तारीकरण रखडले होते. यात आता रावेर (ता. धुळे) औद्योगिक क्षेत्राच्या विस्तारासाठी महसूल विभागाची २८९ हेक्टर ६९ आर (सुमारे ७२५ एकर) जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला उपलब्ध करून देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी (ता. २७) मंजुरी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या ‘एमआयडीसी’ विस्तारीकरणाच्या निर्णयामुळे धुळेकरांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड झाली असून, स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत.
-
विधानसभा निवडणुकीदरम्यान धुळे शहरालगत रावेर येथे ‘एमआयडीसी’ विस्तार करण्याचे आश्वासन आमदार अनुप अग्रवाल यांनी दिले. या आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी ते गेल्या दोन वर्षांपासून शासनाकडे सतत पाठपुरावा करत होते. तसेच, जिल्ह्याला सुमारे २५ वर्षांनंतर स्थानिक पालकमंत्री मिळाल्यामुळे जिल्ह्याच्या प्रश्नांची जाण असणारे पालकमंत्री जयकुमार रावल आणि आमदार अग्रवाल यांच्या संयुक्त प्रयत्नांना व पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर मुंबईत मंत्री रावल यांनी या निर्णयाची माहिती दिली. धुळे हा आकांक्षित जिल्हा असल्याने येथे उद्योगांची वाढ, गुंतवणुकीला प्रोत्साहन आणि स्थानिक रोजगारनिर्मिती यांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
-
‘भाव्या’ योजनेत समावेश
केंद्र सरकारच्या ‘भाव्या’ (भारत विकास उद्योग) योजनेत रावेर ‘एमआयडीसी’चा समावेश करण्यासाठी ३१ ऑक्टोबर ही अंतिम मुदत आहे. या मुदतीपूर्वी सर्व आवश्यक आदेश काढून या योजनेत रावेरचा समावेश करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. यामुळे रावेर औद्योगिक विकासाला अधिक गती मिळून केंद्र व राज्य शासनाच्या योजनांच्या माध्यमातून पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि उद्योग उभारणीला मोठी चालना मिळणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल आमदार अग्रवाल यांनी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री रावल यांचे धुळेकरांतर्फे आभार मानले.
-
१४-१
...कोट...
१४-१
फोटो क्रमांक ः 33711....जयकुमार रावल
१४-१
केंद्र सरकारच्या औद्योगीकरणाला चालना देणाऱ्या ‘भारत विकास उद्योग’ (भाव्या) योजनेत समावेशासाठी ३१ ऑक्टोबरची अंतिम मुदत असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मुदतीच्या आत रावेर शिवारातील औद्योगिक वसाहतीचा या योजनेत समावेश करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे धुळ्यात अत्याधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यास मदत होणार आहे.
- जयकुमार रावल, पालकमंत्री, धुळे जिल्हा
--
१४-१
...कोट...
१४-१
फोटो क्रमांक ः 33709....अनुप अग्रवाल
१४-१
रावेर शिवारात ७२५ एकर जमीन ‘एमआयडीसी’कडे हस्तांतरित करण्यास मिळालेली मंजुरी म्हणजे धुळेकरांना शासनाने दिलेली दिवाळीची भेटच आहे. दोन वर्षांपासून सुरू असलेल्या आमच्या पाठपुराव्याला यश आले असून, यामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळेल आणि स्थानिक युवक- युवतींना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल.
- अनुप अग्रवाल, आमदार, धुळे शहर
--
१४-१
...कोट...
१४-१
फोटो क्रमांक ः 33710....वर्धमान सिंगवी
१४-१
विस्तारीकरणात बहुप्रतिक्षित रावेर औद्योगिक वसाहतीसाठी कित्येक दशकांपासून प्रयत्न सुरु होते. अशक्यप्राय वाटणारी बाब स्थानिक लोकप्रतिनिधींच्या चिकाटी आणि भगीरथ यशस्वी प्रयत्नांतूनच अखेर शक्य झाली. या निर्णयामुळे औद्योगिक पायाभूत सुविधा, नवीन गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीसाठी मोठ्या संधी उपलब्ध होतील. राज्य शासनासह पालकमंत्री, धुळे शहर आमदारांचे औद्योगिक संघटनांतर्फे अभिनंदन व आभार व्यक्त करतो.
- वर्धमान सिंगवी, अध्यक्ष, लघु उद्योग भारती, धुळे