यंदाचा रवींद्र दामले पुरस्कार
परिवर्तन संस्थेला जाहीर
उपशीर्षक
शुक्रवारी पुण्यात वितरण सोहळा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १९ : महाराष्ट्र कल्चरल सेंटर पुणे यांच्यातर्फे दरवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘रवींद्र दामले स्मृती पुरस्कार’ यंदा जळगावच्या परिवर्तन संस्थेला जाहीर झाला आहे.
येत्या २३ ऑक्टोबरला पुणे येथील श्रीराम लागू रंग-अवकाश येथे होणाऱ्या समारंभात हा पुरस्कार देण्यात येणार आहे. परिवर्तन जळगाव या संस्थेच्या अनेक वर्षांच्या कामाबद्दल हा पुरस्कार देण्यात येणार आहे. गेल्या सोळा वर्षांपासून परिवर्तने सातत्याने विविध नाट्यनिर्मिती, संगीतमय कार्यक्रमाची निर्मिती, नाट्य कार्यशाळा, व्याख्यान, चर्चासत्र, महोत्सव, प्रेक्षक सभासद योजना, यामधून खानदेशी सांस्कृतिक विश्व समृद्ध केले आहे.
परिवर्तन निर्मित नाटकांचे व सांगितिक कार्यक्रमांचे प्रयोग आता केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात व्हायला लागले आहेत. जळगाव शहरातील कलावंतांची निर्मिती आता देशभर जाते आहे. याच कामाची दखल घेत पुणे येथील महाराष्ट्र कल्चर सेंटरने परिवर्तनला हा पुरस्कार जाहीर केला आहे.
परिवर्तनच्या या यशाबद्दल परिवर्तनचे मार्गदर्शक अशोक जैन, विजय बाविस्कर, श्रीकांत देशमुख, अनिल पाटकर, यासोबतच परिवर्तनचे प्रमुख अनिल कांकरिया, अनिश शहा, नंदलाल गादिया, किरण बच्छाव, अमर कुकरेजा छबीराज राणे, नारायण बाविस्कर, मंजूषा भिडे, सुदीप्ता सरकार यांनी सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
----