धुळ्यातील ‘त्या’ भूखंडधारकांना पुन्हा नोटीस

महापालिका आयुक्तांकडे सुनावणी; मालकीच्या पावणेदोनशे जागांच्या कराराचा प्रश्‍न
Dhule Muncipal corporation
Dhule Muncipal corporationSakal

धुळे - येथील तत्कालीन पालिका व विद्यमान महापालिकेने शहरातील पावणेदोनशे भूखंड सामाजिक संस्थांना कराराने दिले आहेत. पैकी बहुतांश संस्थांचे करार संपले असताना संबंधित संस्थांनी त्या जागा महापालिकेला हस्तांतरित केल्या नाहीत. त्यामुळे प्रशासनातर्फे जागा ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे संबंधित संस्थांना नोटीस बजावली जाईल व यासंदर्भात आयुक्त देविदास टेकाळे यांच्यापुढे जागांविषयक सुनावणी होईल. महापालिका मालकीचे ठिकठिकाणी असलेले सुमारे १७४ भूखंड हे ३० ते ३५ वर्षांपर्यंत सामाजिक संस्थांना कराराने दिले आहेत. बहुतांश संस्थाचे करार आता संपुष्टात आले आहेत. मात्र, संबंधित संस्थांनी त्या जागा महापालिकेच्या ताब्यात दिलेल्या नाहीत.

महापालिका मालकीच्या भूखंडांबाबत स्थायी समितीचे माजी सभापती संजय जाधव यांनी तक्रार केली. त्यानुसार किती भूखंड कोणत्या संस्थेला कराराने दिले आहेत. किती संस्थांचे करार संपले आहेत यासंबंधीची माहिती घेण्यासाठी इस्टेट मॅनेजरची नियुक्ती झाली. तत्कालीन पालिका व महापालिकेने सामाजिक संस्थेला जागा देण्यासाठी केलेले ठराव शोधण्यात आले. नंतर प्रशासनाने जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली. पहिल्या टप्प्यात ज्या संस्थांचे करार संपले होते, त्यांना नोटीस पाठवली. या नोटिशीला सामाजिक संस्थांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. नंतर आता पुन्हा नोटीस देण्यात येणार आहे. याबाबत आयुक्तांकडे या जागांविषयी सुनावणी होईल. तथापि, महापालिकेची हद्दवाढ होऊन सरासरी चार वर्षांचा कालावधी उलटला आहे. महापालिका हद्दीत समाविष्ट काही ग्रामपंचायतीच्या जागेवर प्लॉट पाडून ते विकण्यात आले आहेत. त्या जागांची माहिती घेण्यासाठी महापालिकेने समिती नियुक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com