''वाचन'' चळवळ कृतिशीलतेस सर्वसमावेशक पुढाकार आवश्यक – लेखक राजेंद्र दिघे

''वाचन'' चळवळ कृतिशीलतेस सर्वसमावेशक पुढाकार आवश्यक – लेखक राजेंद्र दिघे
Published on: 
फोटो -16118 मालेगाव : ‘वाचन संस्कृती आणि मोबाईल’ या विषयावर बोलतांना राजेंद्र दिघे ----- वाचन प्रेरणादिनानिमित्ताने राजेंद्र दिघे यांचे व्याख्यान सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता.१८ : महापालिकेतर्फे माजी राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्ताने वाचन प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमात लेखक राजेंद्र दिघे यांचे ‘वाचन संस्कृती आणि मोबाईल’ या विषयावर व्याख्यान झाले. उपायुक्त डॉ. सुनिता कुमावत, पल्लवी शिरसाठ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी गजानन पाटील उपस्थित होते. प्रतिमेचे पूजन करण्यात आले. श्री. दिघे म्हणाले की, वाचन संस्कृती ही समाजाच्या वैचारिक प्रगतीचा पाया आहे. आजच्या डिजिटल युगात मोबाईलचा वापर अपरिहार्य झाला असला, तरी त्याच्या अतिवापरामुळे वाचनाची सवय कमी होऊ नये, यासाठी वाचन चळवळ कृतिशील करण्यासाठी सर्वसमावेशक पुढाकार घेणे आवश्यक आहे, महापालिकेच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाजात हलकं फुलकं वाचन मनःशांती देणारे ठरते. मोबाईलचा वापर पूर्णपणे टाळण्यापेक्षा त्याचा विधायक उपयोग करून साहित्य, ज्ञान आणि विचारांशी नाते जोडले पाहिजे. जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. प्रतीक अहिरे, जनगणना विभाग प्रमुख सचिन भामरे, प्रभाग अधिकारी बळवंत बाविस्कर, महेश गांगुर्डे, फैय्याज अहमद, प्रमुख स्वच्छता निरीक्षक आनंदसिंग पाटील, अनिल सांगळे, प्रवीण पवार, लिपिक गजानन बन्नापुरे, अजय पगारे, मिस्बाह शेख, रत्ना जाधव, मंगला हिरे, माधुरी सावळे, शर्वरी देसाई, नुरुल अमीन, कैलास ठाकरे, स्वप्नील हिरे उपस्थित होते.
Marathi News Esakal
www.esakal.com