नाशिक- खापरावरची मऊसुत खरपूस पुरणाची पोळी, त्यावर तुपाची धार आणि सोबतीला आंबट गोड आंब्याच्या रसावर यथेच्च ताव मारत अक्षयतृतीयेच्या सणाचा आनंद व्दिगुणित होतो. सणाच्या दिवशी घराघरात कामांची लगबग सुरू असल्याने आता रेडिमेड पुरणपोळी आणि आंब्याचा रस विकत घेण्याकडे नाशिककरांचा ओढा वाढलेला आहे.