नाशिक- देशात दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीतील शहरांच्या रियल इस्टेट क्षेत्रात वाढ होत आहे. गेल्या वर्षात तीन हजार २९४ एकर क्षेत्र अधिग्रहित करण्यात आले. त्यातील ४४ टक्के क्षेत्र अशा प्रकारच्या शहरांमधील आहे. साठ शहरांमध्ये सहा लाख ८१ हजार १३८ घरांची विक्री झाली असून, २३ टक्क्यांनी वार्षिक वाढ नोंदविली गेल्याचा निष्कर्ष ‘क्रेडाई- लायसेस फोरास’च्या अहवालात नमूद करण्यात आला आहे.