70 पैसे लिटर पेट्रोल दराची पावती चर्चेत! जुनी आठवण

Receipt-of-seventy-paise-liter-petrol-price
Receipt-of-seventy-paise-liter-petrol-priceesakal
Updated on

जुने नाशिक : ‘गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी’, सध्याच्या विविध गोष्टींचा विचार केला तर अनेकांच्या तोंडातून हे बोल बाहेर पडणे सहाजिक आहे. केवळ पेट्रोल दरावर बोलायचे झाले, तर सध्याचे पेट्रोल दर (petrol rates) शंभरी पार केले आहे. याचा परिणाम केवळ वाहनधारकांवरच झाला आहे असे नाही. किराणा मालापासून, तर विविध वस्तूंच्या महागाईत भर पडण्यासाठी मदत झाली आहे. अशा वेळेस जुन्या काळाची आठवण नागरिकांना होऊ लागली आहे. (Receipt-of-seventy-paise-liter-petrol-price-viral-social-media-nashik-marathi-news)

सोशल मीडियावर चर्चेचा विषय

पेट्रोल दराचा भडका उडण्यासाठी कच्च्या तेलाच्या किमती असो वा राजकारण त्याच्याशी नागरिकांना घेणे देणे नाही. त्यानंतर केवळ महागाई कमी व्हावी, याची चिंता आहे. सध्या समाजावर महागाईचा कसा परिणाम झाला आहे. हे बघणे अतिशय महत्त्वाच्या आहे. त्यामुळेच नागरिकांना जुने दिवस आठवण करण्याची वेळ आली आहे. काही दिवसापासून सोशल मीडियावर भारत पेट्रोलियम कंपनीच्या पंपावरील २ फेब्रुवारी १९६३ ची पावती प्रसारित होत आहे. त्यावर पाच लिटर पेट्रोलची किंमत ३ रुपये ५० पैसे दर्शविली आहे. त्या दराचा विचार केला तर प्रतिलिटर ७० पैसे दर असल्याचे स्पष्ट होत आहे. आजचे दर लक्षात घेतले तर, गेल्या ५८ वर्षात नागरिकांना किती पट दर वाढले आहे. याचा विचार करणेदेखील अवघड होत आहे. त्यामुळे ती प्रसारित होणारी पावती बघून नागरिक विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहे. त्या काळाचा आणि आत्ताचा विचार केला तरी इतक्या मोठ्या प्रमाणात तफावत येणे. ही गोष्ट सर्वांना विचारात टाकण्यासारखे आहे. दुसरीकडे सरकारकडून दरांमधील तफावत दूर करण्याचा प्रयत्न केला, तर महागाईवर नियंत्रण येण्यास मदत होईल. शिवाय इंधनाचे दरदेखील पूर्वीसारखे सामान्य राहण्यास मदत होईल, अशा प्रतिक्रिया यानिमित्ताने सोशल मीडियावर उमटत आहेत.

५८ वर्षापूर्वीच्या पेट्रोलच्या दराची आठवण

शंभरी पार गेलेले पेट्रोल दर (petrol rates) लक्षात घेता, शहरवासीयांना ५८ वर्षापूर्वीच्या पेट्रोलच्या दराची आठवण होत आहे. सत्तर पैसे लिटर पेट्रोल दर असल्याचा पुरावा असलेली पावती सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Receipt-of-seventy-paise-liter-petrol-price
जिल्ह्यात मराठी शाळांना मिळतेय पसंती; पटसंख्येत दुपटीने वाढ
Receipt-of-seventy-paise-liter-petrol-price
सामान्य नागरिकांनादेखील घरपट्टी माफीची अपेक्षा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nashik Ring Road controversy
Political Shift in Malegaon Municipal Corporation
Digital Deadlock: Maha e-Seva Centers Paralyzed as Government Portal Crashes
Nashik TCS conversion case
Marathi News Esakal
www.esakal.com