1 जून सार्वजनिक वाढदिवसदिनी ग्रामीण भागात केकची विक्रमी विक्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cake shop

1 जून सार्वजनिक वाढदिवसदिनी ग्रामीण भागात केकची विक्रमी विक्री

निवाणे (जि. नाशिक) : १ जून या सार्वजनिक जन्मतारखेच्या दिवशी ग्रामीण भागात (Rural Areas) मोठ्या प्रमाणात केकची (Cake) विक्री झाली. जन्मतारखेची पक्की नोंद नसलेले विद्यार्थी जेव्हा शालेय शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचे त्यावेळी शिक्षकांद्वारे १ जून ही त्यांची जन्मतारीख (Birthday) नोंद केली जायची. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बहुतांश नागरिकांची जन्मतारीख १ जून अशी आढळते. सोशल मीडियावर आजचा दिवस नेटीझन्स (Netizens) जागतिक वाढदिवस (World Birthday) म्हणून साजरा करत आहेत. (Record sale of cakes in rural areas on June 1 public birthday Nashik News)

वडील, काका, मावशी, आजी, आजोबा आदी आप्तेष्टांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केकची खरेदी केली गेली. ग्रामीण भागातही केकची क्रेझ वाढली आहे. यामुळेच केक पार्लर, शॉपमध्ये ग्राहकांची गर्दी होऊन मोठ्या प्रमाणात केकची विक्री झाली. निवाणे येथील वसंत बापू आहेर यांच्या दुकानातून केकच्या विक्रीने शंभरी पार केली. दीडशे रुपयांपासून ते साडेचारशे रुपयांपर्यंतचे विविध स्वादात व आकारात असलेले केक त्यांनी विक्रीसाठी ठेवले होते. परंतु, ग्राहकांच्या प्रतिसादामुळे तेवढे केक उपलब्ध करून देणे त्यांना अवघड झाले होते.

Web Title: Record Sale Of Cakes In Rural Areas On June 1 Public Birthday Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top