Sakal Exclusive : दस्त नोंदणी कमी होवूनही बाराशे कोटी महसुल; अतिरिक्त उद्दिष्ट गाठण्यात यश

Department of Revenue
Department of Revenueesakal

नाशिक : कोरोनामुळे मरगळलेल्या रिअल इस्टेट क्षेत्राला चैतन्य प्राप्त करून देण्यासाठी राज्य शासनाने आगामी आर्थिक वर्षात रेडिरेकनरचे दर जैसे- थे ठेवल्याने बांधकाम व्यवसायाला दिलासा मिळाला असला तरी मागील आर्थिक वर्षात दस्तांची नोंदणी जवळपास १३३ टक्के झाल्याने दस्त नोंदणीला ब्रेक नको म्हणूनही हा निर्णय घेण्यात आला आहे. (registration of dates has decreased compared to financial year revenue has reached nearly Rs 1200 crore nashik news)

दरम्यान, मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत दस्तांची नोंदणी कमी झाली असली तरी महसुल मात्र जवळपास १२०० कोटी रुपयांपर्यंत पोचला आहे. जमीन, फ्लॅट, बंगला, गाळे आदी मालमत्तांची नोंदणी दुय्यम निबंधकांकडे कार्यालयाकडे होते. नाशिक जिल्ह्यात सात कार्यालये असून, त्यातील पाच कार्यालये शहरात आहेत.

सातही कार्यालयांमध्ये २०१९ वर्षात मोठ्या प्रमाणात दस्त नोंदणी झाली होती. २०२० मध्ये एक लाख ३७ हजार २१२, तर २०२१ मध्ये एकूण एक लाख ३७ हजार ६६७ दस्त नोंदणी झाली. त्यातून ८०२.२७ कोटींचा महसुल प्राप्त झाला.

२८ फेब्रुवारी २०२३ पर्यंतच्या आर्थिक वर्षात एक लाख २६ हजार ४८१ दस्तांची नोंद झाली असली तरी महसुल मात्र एक हजार १८१ कोटींच्या वर पोचले आहे. शासनाने एक हजार पन्नास कोटींचे उद्दिष्ट नाशिकसाठी निश्चित केले होते. एकूण उद्दिष्टाच्या बारा टक्के अतिरिक्त उद्दिष्ट गाठण्यात यश मिळाले आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Department of Revenue
Jalgaon News : पाडळसरे धरणाच्या प्रस्तंभाचे काम सुरू; अनिल पाटलांच्या प्रयत्नांना यश

रेडिरेकनरचे दर कायम

कोरोनामुळे सप्टेंबर २०२० मध्ये बाजारमूल्य तक्त्याचे दर (रेडिरेकनर) निश्‍चित करण्यात आले होते. कोरोनामुळे रेडिरेकनर दरामध्ये वाढ करू नये अशी मागणी बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई संस्थेने केली होती. त्याची दखल घेत शासनाने रेडिरेकरनरच्या दरात वाढ न करता यापुढेही दर कायम ठेवले होते. त्यानंतर आता २०२३-२४ या आर्थिक वर्षातदेखील रेडिरेकनरचे दर जैसे-थे ठेवल्याने बांधकाम व्यावसायिकांना दिलासा मिळाला.

दस्त नोंदणी ईस्टांक स्थिती

महिना वसुली (कोटीत)
एप्रिल- २०२२ ६३
मे- २०२२ ८९.२
जून- २०२२ ११२.२१
जुलै- २०२२ ११६.२३
ऑगष्ट- २०२२ १४०.२१
सप्टेंबर- २०२२ ११०.८९
नोव्हेंबर- २०२२ ९९.४४
डिसेंबर- २०२२ ११३.५६
जानेवारी- २०२३ १२०.१७
फेब्रुवारी- २०२३ १०८.४७
मार्च- २०२३ ००००
एकूण ११८१.०९

Department of Revenue
Onion Subsidy : शेतकऱ्यांनी कांदा अनुदानासाठी 'या' तारखेपर्यंत अर्ज करावेत; चंद्रकांत पवार यांचे आवाहन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com