मृत्यूनंतर तब्बल दोन महिन्यांनी अस्थी विसर्जन

 asthi-visarjan
asthi-visarjan Google

पंचवटी (नाशिक) : कोरोना प्रादुर्भावाने एप्रिल मे महिन्यात मृत्यूचा आलेख चढताच राहिला. या काळात कडक निर्बंधांमुळे अनेकांवर आपल्या आप्तांच्या अस्थी घराजवळ जपून ठेवण्याचा कटू प्रसंग उद्‌भवला. मात्र, आता निर्बंध काही प्रमाणात शिथिल झाल्याने त्यातील अनेकजण घराजवळ जतन केलेल्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठी रामकुंडावर गर्दी करत असल्याचे जळजळीत वास्तव आहे. (relatives are flocking to ramkunda to the asthi-visarjan of deceased in nashik)

मार्च एप्रिलमध्ये कोरोनाने राज्यासह जिल्हाभरात मोठे थैमान घातले होते. या काळात अनेक कुटुंबातील एकापेक्षा अधिक सदस्यांचा कोरोना प्रादुर्भावाने मृत्यू ओढावला. यात अनेक कुटुंबातील पती- पत्नी, मुलगा- आई, मुलगा व वडील असे एकापेक्षा अधिक सदस्यांना मृत्यूने गाठले. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने प्रवासावर रामकुंडावर येण्यास कडक निर्बंध घातले होते. त्यामुळे अनेकांना आपल्या आप्तांच्या निधनानंतर त्यांच्या अस्थी विसर्जनासाठी अडचणी आल्या होत्या. विदर्भ, मराठवाड्यासह जिल्ह्याच्या अनेक भागात अशीच स्थिती होती. त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या आप्तांच्या अस्थी घराजवळच सुरक्षित ठेवण्यास अनेकांनी पसंती दिली. परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर विधिवत अस्थी विसर्जन करू, असे आयोजन अनेकांनी केले होते. आता परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागल्याने त्यातील अनेकजण चक्क दीड महिन्यानंतर संबंधितांच्या अस्थी घेऊन येत आहेत. खरेतर निधनानंतर त्याचदिवशी किंवा दुसऱ्या दिवशी रामकुंडात अस्थी विसर्जन केले जाते. मात्र, कोरोनामुळे अशी परिस्थिती पहिल्यांदा उद्भवल्याचे संबंधितांनी सांगितले.

 asthi-visarjan
नाशिक जिल्ह्यातील जमीन सुपीकतेत 15 वर्षात मोठा बदल!

अस्थी स्मशानातच पडून

एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यावर जवळच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याची प्रथा आहे. हिंदू धर्मात अंत्यसंस्काराइतकेच अस्थी विसर्जनाला महत्त्व आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारानंतर सात ते आठ तासांनी मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नातलग स्मशानात अस्थी गोळा करण्यासाठी येतात. त्यानंतर या अस्थी विधिवत रामकुंडातील अस्थी कुंडात विसर्जित करण्याची परंपरा आहे. कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मोजकेच लोक उपस्थित असतात. त्यातील काहीजण अस्थी घेण्यासाठी वेळेवर न येता स्मशानातील कर्मचाऱ्याला अस्थी गोळा करून ठेवण्यास सांगत. मात्र मृत्युमुखी पडलेल्या अनेकांचे आप्त अस्थी घेण्यासाठी स्मशानाकडे न फिरकल्याने काहींचे अस्थिकलश स्मशानात तसेच पडून असल्याचे जळजळीत वास्तव आहे.

 asthi-visarjan
महाराष्ट्राचे ‘भरतपूर' नांदुरमध्यमेश्वरला कमळांचा साज!

मध्यंतरीच्या काळात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेकांना अस्थी विसर्जन करणे शक्य झाले नव्हते. अशा कुटुंबातील सदस्य परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागल्याने तब्बल महिना दीड महिन्यांनी अस्थी विसर्जनासाठी रामकुंडावर येत आहेत.

- नितीन पाराशरे, पुरोहित

(relatives are flocking to ramkunda to the asthi-visarjan of deceased in nashik)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com