नाशिक- गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयांच्या नोंदणी व नूतनीकरणास महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून विलंब होत असल्याने प्राप्त तक्रारीनुसार आता रुग्णालय नोंदणी, परवाना नूतनीकरणासाठी ऑनलाइन पद्धत अवलंबिण्यात आली आहे. .महापालिका हद्दीत ५७० खासगी रुग्णालये आहेत. नवीन रुग्णालयांची नोंदणी व नोंदणी झालेल्या रुग्णालयांच्या परवाना बंधनकारक आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत परवानगीची प्रक्रिया पार पडते. गेल्या काही महिन्यांमध्ये रुग्णालयांना परवानगी घेताना व परवाना नूतनीकरण करताना अडचणींचा डोंगर पार करावा लागत होता. वैद्यकीय विभागाची अंतिम स्वाक्षरी असली तरी अग्निशमन, नगररचना विभागाकडून देखील रुग्णालयांची पिळवणूक केली जाते..या संदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनने महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार रुग्णालयांना विविध प्रकारच्या परवानगीसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्याचा निर्णय घेतला. राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यात समावेश करण्यात आला. शुक्रवारी (ता. ११) अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर यांच्या उपस्थितीत पोर्टलची यशस्वी तांत्रिक चाचणी घेण्यात आली. त्यानंतर आता महापालिका क्षेत्रातील रुग्णालयांची नोंदणी, नूतनीकरण ऑनलाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंगळवारपासून (ता.१५) ऑनलाइन रुग्णालय नोंदणी, नूतनीकरण करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे..का आहे परवाना नूतनीकरण बंधनकारक?मुंबई शुश्रृषागृहे अधिनियम १९४९ व सुधारित नियम २००६ अन्वये महापालिका कार्यक्षेत्रातील रुग्णालये, प्रसूतिगृह, नर्सिंग होमला महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. तसेच, दर तीन वर्षांनी परवाना नूतनीकरण करणे बंधनकारक आहे. .महत्त्वाची कागदपत्रेपरवाना नूतनीकरण करण्यासाठी पदवीचे प्रमाणपत्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दाखला, महापालिकेचा नगररचना विभाग व अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला, बायोमेडिकल वेस्ट प्रमाणपत्र, इलेक्ट्रिकल ऑडिटचे प्रमाणपत्र वैद्यकीय विभागात सादर करणे बंधनकारक आहे..वैद्यकीय क्षेत्रातून स्वागत ऑनलाइन पद्धत अवलंबिताना ज्या कर्मचाऱ्यांकडे परवानगी देण्यासाठी अर्ज करावा लागायचा,त्या कर्मचाऱ्यांची प्रशासनाने उचलबांगडी केल्याने ऑनलाइनच्या निर्णयापेक्षा कर्मचाऱ्यांच्या उचलबांगडीचे अधिक स्वागत वैद्यकीय क्षेत्रातून केले जात आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.