नाशिक- काठे गल्ली परिसरातील प्रार्थनास्थळाचे अनधिकृत बांधकाम महापालिकेने हटविल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात स्थगिती दिली होती. यासंदर्भात सोमवारी (ता. २१) सुनावणी होऊन न्यायालयाने याचिकाकर्त्यांची याचिका रद्द करताना उच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल करण्याचा सल्ला दिला. दरम्यान, ट्रस्टतर्फे या विषयावर बोलण्यास नकार दिला.