नाशिक- भाभानगर येथील महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर धार्मिकस्थळाचे अनधिकृत बांधकाम करून दोन समाजांत धार्मिक तेढ निर्माण वक्फ बोर्डाकडून केला जात असल्याचा आरोप करताना यासंदर्भात विधानसभेत आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी लक्षवेधी सूचना मांडली आहे. राज्याच्या अल्पसंख्याक विभागाच्या अवर सचिव विशाखा आढाव यांनी वस्तुस्थतीदर्शक अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देश महापालिकेसह जिल्हाधिकारी व वक्फ मंडळाला दिले.