Nashik News: संरक्षक भिंत कामासाठी अतिक्रमण हटवा! ‘मेरी’ चे जिल्हाधिकारी, NMC आयुक्तांना साकडे

Maharashtra Engineering Research Institute
Maharashtra Engineering Research Instituteesakal

Nashik News : दिंडोरी रोडवरील जलगती विभाग परिसराजवळ झोपडपट्टी असल्याने २०१४-१५ मध्ये संरक्षक भिंतीचे काम ७० मीटर वगळून सुरू केले होते. स्थानिकांच्या विरोधामुळे हे काम पूर्ण झाले नाही.

त्यामुळे अतिक्रमणधारकांचा त्रास व परिसराचा गैरवापरासह चोरीच्या घटना वाढल्या आहेत. हा उपद्रव कायमस्वरूपी संपवण्यासाठी संरक्षक भिंतीचे काम करणे गरजेचे आहे. त्यासाठी महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेला (मेरी) हे अतिक्रमण काढायचे आहे.

स्थापत्य बांधकामे परिरक्षण विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयातर्फे यासंबंधाने जिल्हाधिकारी आणि नाशिक महापालिकेच्या आयुक्तांना साकडे घालण्यात आले आहे. (Remove encroachment for protective wall work MERI notice to Collector NMC commissioner Nashik News)

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातंर्गतच्या राज्यातील विविध पाटबंधारे प्रकल्पांच्या शास्त्रीय अभ्यास व संशोधनासाठी मेरी संस्थेला पंचवटीतील दिंडोरी रोडलगत १४८ हेक्टर ५२ आर जमीन दिली आहे.

संपूर्ण क्षेत्रावर संरक्षक भिंत मोडकळीस आल्याने निधी आवश्‍यकतेनुसार संरक्षक भिंतीचे काम करण्यात येत आहे. परिसरात होणाऱ्या उपद्रवाची माहिती पोलिसांना वेळोवेळी कळविली आहे, असे जिल्हाधिकारी, आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

जलगती विभागाच्या परिसरात मेरीच्या इमारती आणि धरणाच्या प्रतिकृती आहेत. विविध प्रकारचे वृक्ष आहेत. या क्षेत्रात मोर राष्ट्रीय पक्षी आहे. आता मेरीतर्फे जलगती परिसरात पायाभूत विकासकामांसाठी शासन मान्यता मिळाली आहे.

विकासकामे करताना अतिक्रमण केलेल्यांचा उपद्रव वाढत आहे. शासकीय मालमत्तेचे नुकसान होत आहे. त्यामुळे संरक्षक भिंतीचे काम करणे आवश्‍यक आहे.

त्याचवेळी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाची कार्यवाही होताना पोलिस संरक्षण मिळावे, अशी विनंती कार्यकारी अभियंता कार्यालयातर्फे केली आहे. याशिवाय अतिक्रमण काढण्यासाठी यंत्रणांना निर्देश द्यावेत, अशी विनंती महापालिका आयुक्तांना करण्यात आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Maharashtra Engineering Research Institute
High Alert in State: राज्यात पोलिस, गोपनीय यंत्रणा सतर्क! देशविघातक कृत्य घडवून आणण्याची शक्यता

मनपाकडे केलेल्या पाठपुराव्याचा घटनाक्रम

० १७ एप्रिल आणि १२ मे २०२३ ला संबंधित अधिकाऱ्यांची भेट झाली नाही

० १८ मे २०२३ ला अतिक्रमण विभागाचे पत्र पंचवटी विभागीय कार्यालयाला पाठविल्याची मिळाली माहिती

० १८ मे २०२३ ला पंचवटी विभागीय अधिकाऱ्यांनी जागा पाहण्याची दर्शवली तयारी

० २३ मे २०२३ ला जागेची पाहणी आणि नकाशावर अतिक्रमण दाखवण्याची सूचना

० २५ मे २०२३ ला अतिक्रमित जागा आणि झोपड्यांची संख्या नकाशावर दाखवली

० १३ जून २०२३ ला पुढील माहिती कळवण्यात येईल असे मिळाले उत्तर

Maharashtra Engineering Research Institute
Nashik Monsoon Rain: पावसाचा फक्त शिडकावा अन् शहरभर वाहतूक कोंडी!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com