नादुरुस्त रोहित्राची माहिती एका क्लिकवर

नादुरुस्त रोहित्राची माहिती एका क्लिकवर
Published on: 
नादुरुस्त रोहित्राची माहिती एका क्लिकवर जिओ लोकेशनमुळे तक्रार नोंदविणे सोपे; दुरुस्ती अथवा बदलाची कार्यवाही जलद होणार सकाळ वृत्तसेवा नाशिक रोड, ता. ६ : शेतकरी तसेच सर्वसामान्य वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा, यासाठी महावितरणने नादुरुस्त रोहित्रांची माहिती देण्यासाठी ‘महावितरण मोबाईल ॲप’वर विशेष सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे बंद अथवा नादुरुस्त रोहित्राची तक्रार ग्राहकांना एका क्लिकवर नोंदविता येणार असून, त्याची दुरुस्ती किंवा बदलाची कार्यवाही जलद होणार आहे. महावितरणने राज्यातील सुमारे ९ लाख २५ हजार वितरण रोहित्रांचे जिओ लोकेशनसह मॅपिंग पूर्ण केले आहे. त्यामुळे रोहित्राजवळ जाऊन मोबाइलचे लोकेशन सुरू केल्यानंतर ॲपवरील ‘नादुरुस्त रोहित्राची माहिती नोंदवा’ या पर्यायाद्वारे तक्रार नोंदविता येईल. त्यासाठी रोहित्राचा फोटो काढून तो ॲपवर सादर करावा लागेल. रोहित्राचे लोकेशन, नाव व डीटीसी क्रमांक ॲपवर दिसणार असल्याने योग्य रोहित्राची निवड करता येईल. तक्रार नोंदवल्यानंतर संबंधित अभियंता व जनमित्रांना संदेशाद्वारे माहिती मिळेल. किरकोळ दोष असल्यास दुरुस्ती, तर रोहित्र पूर्णपणे नादुरुस्त असल्यास ते बदलण्याची कार्यवाही केली जाईल. कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर तक्रारदाराला व्हॉट्सॲपद्वारे माहिती दिली जाणार आहे. तसेच संकेतस्थळ, ग्राहक सुविधा केंद्र आणि १८००२१२३४३५, १८००२३३३४३५, १९१२, १९१२० या टोल फ्री क्रमांकांवरही तक्रार नोंदविता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com