
Nashik Crime: गोवंश जनावरांची पोलिसांकडून सुटका
Nashik Crime : अवैध वाहतूक होत असलेल्या सुमारे ४२ लहान मोठ्या गोवंश जनावरांची सुटका पोलिसांकडून करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ आणि भद्रकाली पोलिस यांनी संयुक्त कारवाई केली.
तिघांना ताब्यात घेण्यात आले असून जनावरांची तपोवन येथील राजलक्ष्मी गोशाळेत रवानगी करण्यात आली आहे. (Rescue of cattle from police Nashik Crime)
वडाळा येथे गोवंश जनावरांना डाबून ठेवण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ मिळाली. त्यांनी भद्रकाली पोलिसांना माहिती दिली. भद्रकाली पोलिस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागूल, विष्णू उगले तसेच श्री. गायकवाड, विशाल काठे, विशाल देवरे, नाजीम पठाण, कयूम शेख, सागर निकुंभ, धनंजय हासे, श्री. राठोड, सचिन आहिरराव यांनी छापा टाकला.
फिरोज कुरेशी (वय.४२,रा. वडाळा गाव), नासिर शेख (वय ३५, रा. वडाळा नाका) तसेच वसीम अत्तार (वय.३६,रा. चौक मंडई) अशा तिघांना ताब्यात घेतले. पोलिस कर्मचारी रवींद्र बागूल यांच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.