गावपाटाच्या दुर्गंधीने खळवाडी बेजार अण्णाभाऊ साठे नगरात पाण्याची समस्या

गावपाटाच्या दुर्गंधीने खळवाडी बेजार  अण्णाभाऊ साठे नगरात पाण्याची समस्या
Published on: 
पान चार जिल्हा -------------- वेध प्रभागाचा लोगो घेणे -------------- प्रभाग क्रमांक ४ (आंबेडकरनगर, खळवाडी, अण्णा भाऊ साठेनगर) २३२९४ सिन्नर : आंबेडकरनगरातील सिमेंट काँक्रीटचा झालेला रस्ता. २३२९६ खळवाडीतील या गावपाटातील दुषित पाणी. खळवाडीत दूषित गावपाटामुळे दुर्गंधीचा त्रास विजेचा लपंडाव अन् अपुऱ्या सुविधांमुळे नागरिक त्रस्त संपत ढोली : सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. २९ : लोंढी गल्लीतील भद्रकाली मंदिरापासून ते खळवाडीपर्यंत आणि शिर्डी महामार्गापासून ते लिंगटांगवाडीपर्यंत पसरलेला हा आदिवासीबहुल प्रभाग आहे. खळवाडीतील रहिवासी गावपाटाच्या दुर्गंधीने सर्वाधिक त्रस्त झाले आहेत, तर जवळच असलेल्या अण्णा भाऊ साठे नगरात पुरेसे पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. या प्रभागातील आंबेडकर नगरातील रस्ते बऱ्यापैकी चांगले असून सांडपाण्याची व्यवस्थाही बरी आहे. मात्र, खळवाडीत सर्वात मोठी समस्या गावपाटाची बनली आहे. उघड्या पाटामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरल्याने नागरिकांना नाक दाबून वावरावे लागत आहे. पाटाच्या लगत राहणाऱ्यांचे जगणे तर अत्यंत अवघड झाले असून, डास व कीटकांचा प्रादुर्भाव वाढल्याने आरोग्याचा प्रश्‍न कायम आहे. त्यामुळे हा पाट बंदिस्त करण्यात यावा, अशी आग्रही मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच हा प्रभाग विजेच्या लपंडावानेही त्रस्त आहे. नळाला पाणी सुटले की नेमकी वीज गायब होते. घरावर पाण्याच्या टाक्या नसल्याने आणि साठवणुकीची सुविधा नसताना इमारतींवर पाणी कसे चढावे, असा प्रश्न रहिवाशांसमोर उभा ठाकला आहे. परिसरातील वीज ट्रान्सफार्मर (रोहित्र) क्षमता वाढवण्याची गरज आहे. लिंगटांगवाडीत अंतर्गत रस्ते होण्याची गरज आहे. हा परिसर शेतीला लागून असल्याने तिथे बिबट्याचा कायम वावर असतो, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पथदीपांची यंत्रणा अधिक सक्षम करण्याची मागणी जोर धरत आहे. --------------- मोर्चे काढूनही हांडे रिकामेच अण्णा भाऊ साठे नगरातील नागरिकांनी आपली पोटतिडकीची व्यथा ‘सकाळ’कडे मांडली. प्रशासनाकडे मोर्चे काढले, निवेदने दिली. तरीही अपुऱ्या पाणीपुरवठ्याची समस्या सुटलेली नाही. समोरच्या गल्लीत पाण्याचा दाब जास्त आणि साठे नगरात अतिशय कमी पाणी, अशी विषमतापूर्ण स्थिती आहे. यावर कोणताही ठोस तोडगा निघत नसल्याने नागरिकांमध्ये प्रशासन विरोधात नाराजीचा सूर आहे. प्रभागासाठी नियोजित प्रस्ताव खळवाडीतील गावपाट बंदीस्तीसाठीचे काम मंजूर पथदीपांची व्यवस्था अधिक सक्षम होणार लिंगटांगवाडीत अंतर्गत रस्त्यांची कामे मंजुरीला आंबेडकरनगर नगरात मरीमाता मंदिरासाठी प्रस्ताव आंबेडकर नगरात टर्फची उभारणी होणार नगरसेवक काय म्हणतात २३२९८ गावापाटाच्या त्रासापासून लवकरच सुटका होणार आहे. हे काम सुरु होणार आहे. प्रभागातील रस्ते जास्तीत जास्त प्रमाणात पूर्ण केले जाणार आहेत. सागर भाटजिरे २३३०० शिवसेनेची एकटी नगरसेविका असून मंत्री दादा भुसे, संजय शिरसाट आदींकडून निधी मिळण्यासाठी चर्चा केली आहे. परंतु, प्रस्ताव तयार करुन दिले जात नाहीत. शोभा जाधव ------------- नागरिकांचे म्हणणे २३३०२ पाणी समस्या व गावपाटाची समस्या तातडीने सोडविणे आवश्यक आहे. या समस्येमुळे नागरिकांना सर्वाधिक अडचणी येत आहेत. राजेंद्र खर्जे, खळवाडी २३३०४ पाणी कधी चार ते कधी सहा दिवसाने येते. पाण्याची येण्याची वेळ निश्चित नाही. त्यामुळे नागिरकांचा बराचसा वेळ हा पाण्याची वाट पाहण्यातच जातो. विलास जाधव, आंबेडकर नगर ----------------- (उद्याच्या अंकात : प्रभाग क्र. ५, परिट गल्ली, सुतार गल्ली, महात्मा फुले शाळा परिसर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com