नाशिक : शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या सोडवा

शिक्षक सेनेतर्फे ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना निवेदन
Resolve pending teacher demands
Resolve pending teacher demandssakal

नाशिक : शिक्षक सेनेतर्फे शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना देण्यात आले. ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात भेट घेऊन शिक्षकांच्या राज्य स्तरावरील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करून निवेदन देण्यात आले.(Resolve pending teacher demands)

Resolve pending teacher demands
नाशिक : बनावट सोने तारण ठेवत बँकेला 24 लाखांचा गंडा

निवेदनात म्हटले आहे, की २००५ नंतर शासकीय सेवेत नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा, शासन स्तरावर वैद्यकीय बिलांसंदर्भात निधी उपलब्ध न झाल्याने बिले प्रलंबित असून, निधी उपलब्ध करून द्यावा, २०२२ ला होणाऱ्या शिक्षक बदल्या योग्य निकषासह ऑनलाईन पद्धतीने कराव्यात, पगाराचा निधी शासन स्तरावर उशिराने उपलब्ध होत असल्याने पगार नियमित वेळेत होत नाही.(nashik news)

Resolve pending teacher demands
नाशिक : ओमिक्रॉन व्हेरिएंटची भीती; नववर्षाचे स्वागत घरीच होणार

निधी लवकर उपलब्ध करावा. संगणक वसुलीस शासन स्तरावरून स्थगिती मिळावी, पेसा क्षेत्रात कार्यरत असेपर्यंत शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी द्यावी आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत. शिक्षक सेनेचे उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस बबनराव चव्हाण यांनी शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत शासन स्तरावर शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्याची विनंती केली. मंत्री सत्तार यांनी लवकरच मंत्रालय स्तरावर बैठक घेण्याचे आश्वासन दिले. शिक्षक सेनेचे उत्तर महाराष्ट्र संघटक संदीप सरोदे, जिल्हा संपर्कप्रमुख धनंजय सरक, त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष दिनकर जगझाप आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com