जिल्ह्यातील पर्यटनावरील निर्बंध आजपासून शिथील

Nashik tourism latest marathi news
Nashik tourism latest marathi newsesakal

नाशिक : आधीच दोन वर्षे कोरोनामुळे (Corona) बंद असलेल्या पर्यटनावर (Tourism) मद्यपी आणि हुल्लडबाजामुळे वनविभागाने (Forest Department) बंदी आणली होती. त्यामुळे पश्चिम पट्यातील पावसाळी (Monsoon) पर्यटनावर आधारीत व्यवसाय धोक्यात आला होता.

अखेर पर्यटन आणि वन विभागाच्या एकत्रित बैठकीनंतर आज शनिवारी (ता.२३) पासून वनविभागाने पर्यटनावरील निर्बंध शिथील केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पावसाळी पर्यटन पून्हा बहरणार आहे.

रस्त्यालगतच्या धबधब्यावर आनंदोत्सव साजरा करीत पर्यटनाला जाण्यासाठी नागरिकांना प्रतिबंध केला तर कोरोनामुळे दोन वर्षापासून आर्थीक प्रश्नांशी झुंजणाऱ्या स्थानीकांचा रोजगार बुडतो. प्रतिबंध केला तर मारामाऱ्या पासून तर धोकादायक सेल्‍फीसारख्या प्रकारातून दुर्घटना घडतात.

अशा कात्रीत सापडलेल्या प्रशासनाने पावसाळी तालुक्यातील यंत्रणेच्या बैठका घेतल्या. त्यानंतर काल वनविभागाने काही अंशी निर्बंध शिथील केले आहे. (Restrictions on tourism in district will be relaxed from today nashik Latest Marathi News)

स्थानिकांची गैरसोय

जिल्ह्यातील किल्ले, धरण व धबधब्यावर मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होते. त्यातून धोकादायक सेल्फीच्या नादात बळी जाण्याचे प्रकार घडतात. हे टाळण्यासाठी वनविभागाने १६ जुलैपासून जिल्ह्यातील पर्यटनस्थळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

तसेच किल्ल्यांवर जाण्यास पर्यटकांवर प्रतिबंध घातला होता. धरण धबधब्यावर प्रतिबंध एकवेळ समजण्यासारखे आहे पण त्या मार्गावरील रस्तेही पोलिसां कडून बंद केले जात असल्याने प्रवाशी व इतर जिल्ह्यात जाउ इच्छिणाऱ्यांची अडवणूक होते.

तसेच स्थानीकांच्या हॉटेल लहान लहान उपहार गृह बंद ठेवावे लागत असल्याने दोन वर्षानंतर पुन्हा बहरु लागलेला पर्यटन व्यवसाय कोलमडून पडला होता.

आजपासून निर्बंध शिथील

वनविभागाच्या पश्चिम विभागाचे उप वनसंरक्षक पंकज गर्ग यांनी यासंदर्भात निवेदन जारी करीत, निर्बंध शिथील केले आहेत. मात्र निर्बंध शिथील केले असले तरी, पर्यटन स्थळी पर्यटकांना मद्यपान आणि धुम्रपान करुन हुल्लडबाजी करु नये.

वन आधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सुचनांचे पालन करावे. अन्यथा भारतीय वन अधिनियम १९२७ व वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार सक्त कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

प्रतिबंधाविषयी होत्या तक्रारी

- बंदी पर्यटनावर असावी रस्त्यावर कशाला

- धरण मार्गावरील रस्तेही बंदमुळे खोळंबा

- कोरोनापासून सातत्याने बंदमुळे अडचण

- हुल्लडबाजांवर आवरा, पर्यटनावर गदा का

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com