MSI26B09757
मुंबई : खासदार डॉ. श्रीकात शिंदे यांना निवेदन देताना शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विशाल देसले.
-----------------
साक्री तालुक्यात सुधारित पंचनामे करावेत
खासदार डॉ. शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
सकाळ वृत्तसेवा
म्हसदी, ता. २० : साक्री तालुक्यातील दुष्काळी पंचनामे नव्याने सुधारीत करण्यात यावेत, अशी मागणी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विशाल देसले यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, विधान परिषदेचे उपाध्यक्ष सचिन अहिर यांच्याकडे केली आहे. तशा आशयाचे निवेदन देण्यात आले.
धुळे जिल्ह्यातील इतर तालुक्यांचा दुष्काळाचा ट्रिगर-एकमध्ये समावेश करण्यात आला आहे. परंतु, साक्री तालुक्यातील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी अंदाजे पंचानामे केल्यामुळे बागायती क्षेत्रात जिरायती क्षेत्राचा जास्त समावेश करण्यात आला आहे. म्हणून साक्री तालुक्यातील दुष्काळी फेर पंचनामे करण्यात यावे, या मागणीचे निवेदन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व विधान परिषदेचे उपाध्यक्ष सचिन अहिर यांना देण्यात आले. साक्री तालुक्यातील बहुतांश भागात बागायती क्षेत्र असल्याने दहिवेल, पिंपळनेर, कासारे, म्हसदी मंडळासह साक्री तालुक्यात सुमारे ९८ हजार हेक्टर पेरणी क्षेत्र आहे. परंतु, या वर्षीच्या दुष्काळाच्या परिस्थितीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. महायुती शासनाकडून धुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहिर झाला. पण, बागायतदार शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याने रोष व्यक्त केला जात आहे. महसूल विभागाच्या तलाठी, मंडल अधिकारी व कृषी विभागाने पंचनामे करताना ठरावीक एकाच ठिकाणी बसून अंदाजे पंचनामे केल्यामुळे बागायती क्षेत्रात जिरायती क्षेत्र दाखवल्यामुळे शासनाकडून मिळणारी मदतीत मोठी तफावत असते. धुळे जिल्ह्यातील महसूल विभाग व कृषी विभाग अधिकाऱ्यांना दुष्काळी पंचनामे सुधारीत करण्याच्या सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महसूल विभागास दिल्याची माहिती श्री. देसले यांनी दिली.