वारकरी संप्रदायाला सन्मान देण्याची कल्कीराम महाराजांची मागणी

वारकरी संप्रदायाला सन्मान देण्याची कल्कीराम महाराजांची मागणी
Published on: 
फोटो : H33409 कावनईसह परिसरातील तीर्थक्षेत्रांचा विकास करा वारकरी संप्रदायाला सन्मान देण्याची कल्कीराम महाराजांची मागणी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २४ : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात कावनई, कपिलधारा, कुसेगाव आणि टाकेद तीर्थ या धार्मिक व ऐतिहासिक महत्त्वाच्या स्थळांचा समावेश करून त्यांच्या विकासाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी आदिनाथ संप्रदायाचे पीठाधीश्वर कल्कीराम महाराज यांनी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली. या तीर्थक्षेत्रांना आयुक्तांनी अद्याप प्रत्यक्ष भेट दिलेली नाही, याकडे लक्ष वेधत त्यांनी संबंधित स्थळांची पाहणी करून विकासासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली. कावनई हे कुंभमेळ्याचे मूळ स्थान असल्याचे नमूद करत या परिसरातील तीर्थक्षेत्रांकडे प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, असे कल्कीराम महाराज यांनी सांगितले. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी पायाभूत सुविधा, भाविकांसाठी सोयीसुविधा आणि धार्मिक-सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनासाठी नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नाशिक जिल्हा संतपरंपरेची भूमी असून, कुंभमेळ्याच्या नियोजनात वारकरी संप्रदायाला योग्य सन्मान मिळावा. संतविचार, सामाजिक एकात्मता आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या ऐतिहासिक व धार्मिक वारशाचे जतन करून परिसरातील तीर्थस्थळांना व्यापक प्रसिद्धी देण्याची गरज त्यांनी अधोरेखित करीत असतानाच कुंभमेळा हा सर्व समाजघटकांसाठी व्यापक धार्मिक व सांस्कृतिक सोहळा असल्याने त्यातून बंधुभाव आणि सर्वसमावेशकतेचा संदेश दिला जावा. प्रमुख शहरांतील व्यवस्थांबरोबरच परिसरातील तीर्थक्षेत्रांच्या विकासाचाही नियोजनात समावेश करावा, असे आवाहन कल्कीराम महाराज यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com