क्रिडा विकासासाठी महापालिकेला पत्र

क्रिडा विकासासाठी महापालिकेला पत्र
Published on: 
क्रीडा सुविधांचे बळकटीकरण करा केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचे महापालिकेला आवाहन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १६ : क्रीडाक्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून व्यापक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत महापालिकेने पुढाकार घेऊन शहरातील क्रीडा सुविधांचे बळकटीकरण करावे, असे आवाहन केंद्रीय युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाचे सचिव हरि रंजन राव यांनी केले आहे. याबाबत त्यांनी आयुक्त मनिषा खत्री यांना विशेष पत्र पाठवले आहे. २०२६-२७ ते २०३०-३१ या कालावधीसाठी खेलो इंडियाची सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. पायाभूत सुविधांचा विकास, गुणवंत खेळाडूंची ओळख, कौशल्यविकास, स्पर्धा-लीगचे आयोजन आणि नागरिकांमध्ये तंदुरुस्तीची जाणीव यावर यात भर देण्यात आला आहे. देशातील अग्रगण्य महापालिकांमध्ये नाशिकचा समावेश असल्याने शहराच्या क्रीडा विकासाचे नेतृत्व महापालिकेने करावे, अशी अपेक्षा पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. जलतरण, ॲथलेटिक्स, सायकलिंग आणि जिम्नॅस्टिक्स या चार क्रीडाप्रकारांवर विशेष लक्ष द्यावे, असे सुचविले आहे. या प्रकारांत एकूण पदक क्षमतेच्या सुमारे ५० टक्के संधी असल्याचे पत्रात नमूद आहे. उद्याने, व्यायामशाळा आणि महापालिकेच्या सार्वजनिक जागांचा वापर करून ‘फिट इंडिया’ उपक्रमाला चालना द्यावी. लहान मुले आणि युवकांमध्ये नियमित व्यायामाची आवड निर्माण करावी, अशीही सूचना आहे. शालेय स्तरावर क्रीडा लीगसाठी शाळा तसेच राज्याच्या क्रीडा व शिक्षण विभागाशी समन्वय साधावा, असे म्हटले आहे. खेलो इंडिया, राज्य शासनाच्या योजना, क्रीडा महासंघ, शाळा, सीएसआर आणि खासगी भागीदारांची मदत घ्यावी. उपलब्ध क्रीडा सुविधांचा अधिक प्रभावी वापर करावा, असेही पत्रात आहे. या कामासाठी महापालिकेने स्वतंत्र नोडल अधिकारी नेमून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल केंद्राला कळवावा, अशी विनंती सचिव राव यांनी केली आहे. --------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.