सेकंड मेन
फोटो : H35217
------------
काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्यासाठी काम करा
निरीक्षक फारुकी यांचे आवाहन; बूथ पातळीवरील कामाचा आढावा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १७ : महागाई, बेरोजगारी आणि स्थानिक नागरी समस्यांनी सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहे. अशा स्थितीत काँग्रेसचे विचार आणि धोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय होणे गरजेचे आहे. बूथ समित्या अधिक सक्षम करून काँग्रेसला पुन्हा गतवैभव प्राप्त करून द्यावे, असे आवाहन काँग्रेसचे नाशिक शहर पक्ष निरीक्षक जावेद फारुकी यांनी केले.
संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि बूथ पातळीवरील कामाचा आढावा घेण्यासाठी नाशिक शहर जिल्हा काँग्रेस समितीची बैठक काँग्रेस भवनमध्ये पार पडली.
या वेळी स्व. जयप्रकाश छाजेड यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रभाग, गट आणि विविध आघाड्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. निरीक्षक फारुकी यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. शहराध्यक्ष नीलेश खैरे यांनी काँग्रेसच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध आंदोलनांची आणि जनसंपर्क मोहिमांची माहिती निरीक्षकांना दिली. नवीन कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करून पक्षवाढीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. पूर्व विधानसभा प्रभारी मनोज पाटील यांनी मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनातून ज्यांची नावे वगळली आहेत, अशा लोकांपर्यंत पोहोचून गट समितीकडून नमुना क्रमांक ६ भरण्याची मोहीम राबविण्याची सुचना केली. शहर राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल रोहित वाघ यांचा सत्कार करण्यात आला. नाशिक शहर अनुसूचित जाती विभागाचे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. या वेळी माजी नगरसेवक रईस शेख, सिराज कोकणी, उल्हास सातभाई, हनीफ बशीर, उद्धव पवार, गौरव सोनार, प्रा. भालचंद्र पाटील, प्रा. आदिनाथ नागरगोजे, शंकर जाधव, विलास निकुंभ आदींनी मनोगत व्यक्त केले. युवक काँग्रेसचे जयेश पोकळे, महिला काँग्रेसच्या स्वाती जाधव, पंचवटी गट अध्यक्ष अभिजित राऊत, नाशिकरोड गट अध्यक्ष किरण जाधव, मध्य गट अध्यक्ष झाकिर अत्तार, राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेचे रोहित वाघ, अनुसूचित जमाती शहराध्यक्ष संतोष ठाकूर आदींनी आपल्या कार्याचा संघटनात्मक अहवाल सादर केला.
------------------------