Traffic Chaos on Main Roads Due to Rickshaw Misconduct
sakal
नाशिक: शहरातील मुख्य रस्त्यावरील चौकांना बेशिस्त रिक्षाचालकांनी विळखा घातला आहे. त्यामुळे वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीत सातत्याने भर पडते. विशेषत: या चौकांमध्ये कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांच्या नाकावर टिच्चून रिक्षाचालक बेशिस्त वर्तन करीत असल्याचे अनुभव सर्वांना रोजच येतात. त्यामुळे चौकात वाहतूक पोलिस नावालाच आहे. रिक्षाचालक भररस्त्यात बेशिस्तपणे रिक्षा थांबवून वाहतुकीला अडथळा निर्माण करीत असतात.