Rickshaw Driver
sakal
नाशिक: रविवार कारंजा येथे रिक्षाने कट मारल्याने रस्त्यावर पडलेल्या एका युवतीने जाब विचारला असता, रिक्षाचालकाने तिला अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच, तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. १९) दुपारी घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात विनयभंगासह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.