Nashik News : रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; एक लाखाचे दागिने केले परत

समाजात माणुसकी आणि प्रामाणिकपणा राहिला नाही, असे म्हटले जाते. मात्र नानावली येथील रिक्षाचालक यास अपवाद ठरला आहे.
Rickshaw puller and Bhadrakali Police while returning gold mangalsutra to original owner.
Rickshaw puller and Bhadrakali Police while returning gold mangalsutra to original owner. esakal

जुने नाशिक : समाजात माणुसकी आणि प्रामाणिकपणा राहिला नाही, असे म्हटले जाते. मात्र नानावली येथील रिक्षाचालक यास अपवाद ठरला आहे.

प्रवासादरम्यान रिक्षाचालक इरशाद जाहीर अली यांच्या रिक्षात सातपूर येथील सनी प्रकाश त्रिभुवन एक लाख रुपये किमतीचे दोन तोळे सोन्याचे मंगळसूत्र विसरले होते. (Rickshaw drivers honesty Jewelry worth one lakh returned to police Nashik News)

Rickshaw puller and Bhadrakali Police while returning gold mangalsutra to original owner.
Inspirational Story : मोलकरणीची कामे करीत व्यवसायातून उभारी

इरशाद यांच्या लक्षात येताच त्यांनी सोन्याचे मंगळसूत्र भद्रकाली पोलिसांच्या हवाली केले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पावर, हवालदार संदीप शेळके, महेशकुमार बोरसे, नारायण गवळी यांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेतला असता, त्रिभुवन यांच्या मालकीचे मंगळसूत्र असल्याचे निष्पन्न झाले.

त्यांना पोलिस ठाण्यात बोलावून खात्री करत मंगळसूत्र परत केले. रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचे भद्रकाली पोलिसांसह त्रिभुवन यांनी कौतुक केले. पोलिसांकडून इरशाद यांचा सत्कार करण्यात आला.

Rickshaw puller and Bhadrakali Police while returning gold mangalsutra to original owner.
Inspirational Story : खचलेल्या मनांसाठी शोभाताई ठरल्या ‘आयडॉल’!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com