रिक्षाचालकावर सहाय्यक आयुक्ताने राेखलं पिस्तुल

रिक्षाचालकावर सहाय्यक आयुक्ताने राेखलं पिस्तुल
Published on: 
रिक्षाचालकावर अधिकाऱ्याने राेखले पिस्तूल रिक्षाला धडक दिल्यावर ‘दादागिरी’; दारू पित असल्याचा रिक्षाचालकावरच आराेप सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ७ : शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मुख्य रस्त्यावर कारचालकाने रिक्षाला मागून धडक दिली. रिक्षाचालकाने जाब विचारल्यावर कारचालकाने थेट शिवीगाळ करून रिक्षाचालकाच्या कानशिलात लगावली. इतक्यावरच वाद न थांबता त्याने थेट पिस्तूल काढून रिक्षाचालकाला धमकावल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अदखलपात्र नोंद करण्यात आली आहे. शहरात शनिवारी (ता.७) विविध समाजमाध्यमांवर एका रिक्षाचालकाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात महाराष्ट्र शासन असे नमूद असलेल्या खासगी कारमधील (एमएच १९, डीएस. ९८८९) व्यक्ती आणि रिक्षाचालक गजानन माळी यांच्यात पार्किंगवरून वाद झाल्याचे दिसते. संबंधित व्यक्ती जिल्हाधिकारी कार्यालयात साहय्यक आयुक्त असल्याचे सांगण्यात येत आहे. कारची रिक्षाला धडक लागल्यावरून वाद सुरू झाल्याचे व्हिडिओत दिसते. रिक्षाचालक माळी यांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ स्वतःच्या कॅमेरात कैद केला असून, संबंधिताने पिस्तुलाचा धाक दाखवत धमकाविल्याचा आरोप केला आहे. तसेच संबंधित व्यक्तीने कानशिलात लगावल्याचेही चित्रीकरणात दिसते. चौकट पोलिसांत तक्रार ही घटना गुरुवारी (ता.५) रात्री आठ वाजेची असून, संबंधित अधिकाऱ्याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यात रिक्षाचालकावरच मद्यपान करीत असल्याचा आरोप केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.