Ring Road
sakal
नाशिक: जिल्ह्याच्या या विकास आराखड्यात प्रस्तावित रिंग रोड हा दरी मातोरी, गवळवाडी, रामशेजमार्गे मानोरी असा नकाशावर आहे. त्याच अलाइनमेंटनुसार रस्ता करावा. यामुळे कमी खर्चात व कमी अंतरात रिंग रोड पूर्ण होणार असल्याचा दावा दरी मातोरी, गवळवाडी, रामशेज येथील ग्रामस्थांनी केला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, खासदारांसह अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.