Nashik Ring Road
sakal
नाशिक: राज्याच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत नाशिक शहर परिक्रमा मार्गाला (रिंग रोड) मान्यता देतानाच, या महामार्गासाठी ३ हजार ९५४ कोटी रुपयांच्या खर्चास शासनाने मंजुरी दिली आहे. विशेष बाब म्हणून, प्रकल्पासाठी ५० टक्के भूसंपादन पूर्ण होताच कार्यारंभ आदेश देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला आहे.