नाशिक- येत्या एप्रिलअखेर महापालिकेच्या वकील पॅनलची मुदत संपुष्टात येत असल्याने महापालिका प्रशासनाने विद्यमान पॅनलला मुदतवाढ न देता नव्याने पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेण्यामागे वकिलांच्या अनुभवाचे निकष बदलण्याबरोबरच महापालिकेच्या विरोधात निकाल जात असल्याचे महत्त्वाचे कारण मानले जात आहे.