मालेगाव : वाढत्या गुन्हेगारीने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह

शहरात सर्रासपणे गोवंश कत्तल, गुटखा विक्री, कुत्तागोली व भांग, गांजा विक्री सुरु आहे.
Maharashtra Police
Maharashtra Policeesakal

मालेगाव (जि. नाशिक) : संवेदनशील शहराची प्रतिमा सावरत असताना, वाढती गुन्हेगारी, चोऱ्या, घरफोड्या चिंताजनक असून, या कारवायांना आळा घालण्यात व गुन्हेगारांचा शोध घेण्यात पोलिसांना येत असलेले अपयश, कारवाईत होणारा विलंब यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील कायदा, सुव्यवस्था अबाधित राखणे, गुन्हेगारांवर वचक, मालमत्तेचे रक्षण यासह पोलिस मॅन्युअलमधील जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी स्थानिक पोलिसांच्या मदतीला वेगवेगळे चार स्वतंत्र पथक आहेत. हे पथक वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचे असल्याने अंतर्गत हेवेदावे, कारवाईतील चढाओढ व वसुलीतील घडामोड यातच गुरफटले असल्याने गुन्हेगार डोईजड झाले. यामुळे शहरवासीय चिंतेत आहेत.

शहरात सर्रासपणे गोवंश कत्तल, गुटखा विक्री, कुत्तागोली व भांग, गांजा विक्री सुरु आहे. पोलिसांच्या आशिर्वादाशिवाय हे सारे होणे शक्य नाही. यातील आर्थिक घडामोडी सातत्याने चर्चेला राहिल्या आहेत. तालुका व किल्ला पोलिसांनी १४ जूनला मोहपाडे शिवारात सुमारे २५ लाख रुपये किंमतीचा पाऊणेपाचशे किलो गांजा जप्त केला. ही कारवाई स्वागतार्ह असली तरी यातील मुख्य संशयित फरारच आहे. मुळात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजा शहरात येतोच कसा, त्याचबरोबर विक्रीसाठीची यंत्रणा उभी राहते कशी, पोलिसांना याबाबत माहिती नाही का, असे असंख्य प्रश्‍न आहेत. यामुळे पोलिसांनी कारवाई अनावधानाने तर केली नाही ना, नेमका किती किलो गांजा मिळाला याबाबतही उलट- सुलट चर्चा सुरु आहे. यातील मुख्य संशयित अस्लम शेख इस्माईल हा अस्लम गांजावाला या टोपन नावानेच परिचित आहे. त्याचा हा नेहमीचाच व्यवसाय आहे. मध्यंतरीच्या काळात शहर व परिसरात अवैध इंधन विक्रीही फोफावली होती. या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस महानिरीक्षकांचे पथक, जिल्हा पोलिस प्रमुखांचे पथक, अपर पोलिस अधिक्षकांचे पथक, उपअधिक्षकांचे पथक असे चार स्वतंत्र पथक आहे. त्याशिवाय स्थानिक पोलिस ठाण्यांच्या गुन्हे शाखा देखील गुन्हे शोध मोहिमेत कार्यरत असतात. हे पथक नेमके काय कारवाया करतात हा संशोधनाचा विषय आहे. या पथकांनी कारवाई केली तर ते नाराज, त्यांनी केली तर हे नाराज यातच या पथकांना गुरफटले आहे.

Maharashtra Police
ई - कचऱ्याच्या रूपाने नाशिककरांसमोर मोठे संकट

याशिवाय शहरातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. चारचाकीही चोरीला जात आहेत. पूर्वी या पथकांमार्फत मोठ्या कारवाया होत होत्या. प्रसिध्दी माध्यमातून त्यांचा मोठा गाजावाजाही होत होता. सध्या कारवाया नसल्याने संशयितांना जणू मोकळे रान मिळाले आहे. चोऱ्या- घरफोड्या, महिलांना एकटे गाठून रस्ता लूट आदी प्रकारही वाढले आहेत. चौका चौकातील टवाळखोर निर्ढावले आहेत. गुन्हेगार दहशत निर्माण करण्यासाठी शस्त्रांसह हैदोस घालत आहेत. अशातच ब्रह्मा कॉम्प्लेक्समध्ये शरद दुसाने या सराफी पेढीत सुमारे २१ लाख ७५ हजार रुपयांची झालेली घरफोडी चिंतेचा विषय आहे. या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांच्या सर्व पथकाने व यंत्रणेने कंबर कसणे गरजेचे आहे. अन्यथा, आगामी काळात सामान्य नागरिकांबरोबर पोलिसांचीही डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

Maharashtra Police
Corona Update : नाशिक जिल्ह्यात ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येत 26 ने घट

कायदा- सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या घटना

* ब्रम्हा कॉम्पलेक्स शरद दुसाने ज्वेलर्स घरफोडी

* अल्लमा एकबाल पुलावर गोळीबार.

* शहा प्लॉटमधील सशस्त्र गुंडांचा धिंगाणा.

* देवीचा मळा भागात गुन्हेगारी टोळीची दहशत.

* कॅम्प - संगमेश्‍वर भागात दुचाकी, चारचाकी चोरांचा सुळसुळाट

* कॅम्प - संगमेश्‍वरात चोरी, घरफोडी, महिलांना गाठून रस्तालुट

* २५ लाखांचा गांजा जप्त

* संशयितांकडे गावठी पिस्तुल व तलवारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com