नाशिक- शहरात २० दिवसांत चार खून झाले असून, प्राणघातक हल्ल्याचे सहा गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांत चॉपर, कोयते, लोखंडी रॉड, लाकडी दांडक्यांचा सर्रास वापर होत आहे. संशयितांना अटक होते. मात्र असे प्रकार थांबत नसल्याने आयुक्तांसमोर गुन्हेगारीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.