नाशिक- शहर परिसरातून सात वाहने चोरट्यांनी चोरून नेली आहेत. वाढत्या चोऱ्यांमुळे वाहनमालकांना मात्र मनस्ताप सहन करावा लागत आहे. चोरीच्या गुन्ह्यांचे उकलीचे प्रमाणही अत्यल्प आहे. सार्वजनिक पार्किंगसह राहत्या घरांचे पार्किंगही असुरक्षित झाली आहेत. .योगेश माधव कळंबे (४१, रा. पंचवटी) यांची मोपेड (एमएच- १५- एचएक्स- १९६६) ६ एप्रिलला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास इंदिरा हाऊससमोर दुचाकीवरून आलेल्या तिघा संशयितांनी त्यांना रोखले आणि कुरापत काढून शिवीगाळ करीत त्यांची मोपेड चोरून नेली. याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल आहे. दुर्गेश आनंदा जाधव (रा. गंगापूर रोड) यांची दुचाकी (एमएच- ४१- एजे- ०१३४) १८ ते २१ एप्रिलदरम्यान राहत्या अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरीला गेली. याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल आहे. .विनोद जगन कंडारे (रा. नाशिक रोड) यांची दुचाकी (एमएच- १५- एफझेड- ४६२१) १७ एप्रिलला सायंकाळी पाचच्या सुमारास पंडित कॉलनीतील मनपा कार्यालयासमोर पार्क केली असता, चोरून नेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल आहे. विशाल साहेबराव आहेर (रा. उत्तमनगर, सिडको) यांची दुचाकी (एमएच- ४१- बीएम- १२१७) २० एप्रिलला मध्यरात्री राहत्या घराच्या समोर पार्क केली असता, चोरून नेली. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. विशाल दिलीप सोनवणे (२८, रा. अशोकनगर, सातपूर) यांची मोपेड (एमएच- १५- एफझेड- २१५४) १० एप्रिलला दुपारी अशोकनगर येथील महिंद्रा मटेरियलच्या गेटसमोर पार्क केली असता, चोरून नेली. .याप्रकरणी सातपूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. बॉबी सुनील रेवगडे (रा. रेवगडे चाळ, देवळाली गाव) यांची दुचाकी (एमएच- १५- एचडी- ३९७०) गुरुवारी (ता. २४) मध्यरात्री राहत्या घरासमोर पार्क केली असता चोरी झाली. याप्रकरणी नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. संतोष बाबूराव डावरे (रा. पंचकगाव) यांची दुचाकी (एमएच- १५- डीए- ५५४७) २१ एप्रिलला बिटको चौकातील उड्डाणपुलाखाली भाजी मार्केटजवळ पार्क केली असता, चोरून नेली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे..ग्रामीण भागात विक्री वा स्क्रॅपचोरलेल्या दुचाकी ग्रामीण भागात अत्यल्प किमतीमध्ये विक्री केल्या जातात. त्यामुळे शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे तर काही चोरटे हे चोरलेली वाहने गॅरेजचालकाला विक्री करतात. गॅरेजचालक या वाहनांचे स्क्रॅप करतात आणि सुटे पार्ट दुसऱ्या वाहनांना वापरतात तर बाकीचे भंगारात विक्री करतात. चोरट्यांना चोरीच्या दुचाकीतून चांगला व सहज पैसा मिळतो. त्यामुळे चोरटे दुचाकी चोरीकडे वळतात असे यापूर्वीच्या अनेक गुन्ह्यांच्या उकलीतून समोर आले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.