टुडे ४ ॲंकर
NSK26H32325
जळगाव : जैन हिल्स येथे आयोजित नदी संवर्धनासंबंधी तीन दिवसीय कार्यशाळेचा नुकताच समारोप झाला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना राजेंद्र सिंह.
---------
नद्या वाचविण्यासाठी निसर्गाशी नाते जपा
उपशीर्षक
डॉ. राजेंद्र सिंह; ‘ब्रह्मगिरीची हिरवाई, गोदावरीची पवित्रता’ नवा नारा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.१५ : नद्या केवळ पाण्याचे स्रोत नाहीत, तर त्या संस्कृतीचा श्वास आणि जीवनाचा आधार आहेत. या नद्यांचे अस्तित्व जपण्यासाठी शासन, समाज, संत आणि उद्योग क्षेत्राने एकत्र येत नदी संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक करावी असे आवाहन करत ‘ब्रह्मगिरीची हिरवाई, गोदावरीची पवित्रता’ हा नवा नारा जलपुरुष राजेंद्र सिंह यांनी जैन हिल्स येथे दिला.
नद्या वाचवायच्या असतील, तर केवळ पाणी नव्हे, तर निसर्गाशी असलेले आपले नातेही जपावे लागेल, या भावनेतून निसर्गरक्षणासोबत मानवी गरजांची पूर्तता करणाऱ्या कायद्याचा आग्रह धरावा अशा महत्त्वपूर्ण विचारमंथनाने महाराष्ट्र नदी संवर्धन अभियानाच्या तीन दिवसीय कार्यशाळेचा समारोप झाला.
कार्यशाळेत विविध विषयांवर सत्रांत चर्चा झाली. सकाळच्या चर्चासत्रात नद्यांच्या स्वच्छता व पावित्र्यात संतांचा सहभाग या विषयावर सविस्तर चर्चा झाली. ‘ब्रह्मगिरीची हिरवाई, गोदावरीची पवित्रता’ आणि ‘नीर, नारी, नदी नारायणी’ या घोषणांनी कार्यशाळेचा समारोप झाला.
राजेंद्र सिंह यांनी नद्या आणि पर्वत या महत्त्वाच्या विषयावर सर्वांचे लक्ष केंद्रीत केले. पर्वत संरक्षण कायद्याच्या प्रारूपासह नदी संवर्धनासाठी आवश्यक कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला. त्याबाबत सविस्तर विचार मंथन केले. निसर्गाचे रक्षण आणि मानवी गरजांची पूर्तता यांचा समतोल साधणारा कायदा सरकारने लवकर मंजूर करावा याबाबत योग्य तो पाठपुरावा करण्यात येईल व लवकरच शासनदरबारी हे ठराव संमत होतील असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. सहभागी प्रतिनिधींना राजेंद्र सिंह यांच्यासह मान्यवरांच्याहस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. सूत्रसंचालन अंकुश नारायणकर यांनी केले.
---------