संततधारेमुळे वासाळी इगतपुरी रस्ता बंद; भात पिकाला जीवदान

Nashik Rain Update
Nashik Rain UpdateSakal

सर्वतिर्थ टाकेद (जि. नाशिक) : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात तीन दिवसांपासून संततधार सुरू असून नदीनाल्यांना पूर आले आहेत. या पावसामुळे भात पिकाला जीवनदान मिळाल्याने शेतकरी समाधानी आहेत. लहान फरशीत साचलेल्या गाळाने पाणी वरून वाहू लागल्याने वासाळा रस्ता बंद झाल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.


आंबेवाडी, खडकेद, इंदोरे, वासाळी, सोनोशी, मायदरा या परिसरात संततधार सुरू आहे. सोमवारी काॕलेजचा पहिलाच दिवस होता, पण वासाळीच्या फरशीला पूर आल्याने रस्त्यावरून भरपूर पाणी वाहत होते, यामुळे पूर्ण वाहतूक बंद होती. मुलांना शाळेत न जाता पुन्हा घराकडे जावे लागले. तालुक्याच्या पूर्व भागात जून, जुलै व आॕगष्टमध्ये पुरेसा पाऊस झाला नव्हता, ती उणीव भरून निघालेली आहे. टाकेद, आधारवड, आंबेवाडीपासून ते धामणगाव, कवडदरा, निनावी ते भरवीर या भागात सुरुवातीला पावसाने एक महिना हुलकावणी दिली होती. भातासाठी पावसाची नितांत गरज असताना संततधार बरसल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Nashik Rain Update
मनसेची एकी कागदावर की प्रत्यक्षात? नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक



लहान पुलाची गरज

निनावी ते वासाळीमार्गे इगतपुरी या पंतप्रधान सडक योजनेतून तयार केलेल्या रस्त्यात वासाळी येथे मोऱ्या टाकलेल्या आहेत, त्यापैकी काही चिखलाने भरलेल्या आहेत. यामुळे येथे नेहमीच पाणी तुंबून ते रस्त्यावरून वाहते. यामुळे सोनोशी, बारशिंगवे, राहुलनगर, कचरवाडी येथील नागरिकांचा घोटी, इगतपुरी, भंडारदराकड़े जाणारा मार्ग बंद होतो. नाशिक येथून येणाऱ्या पर्यटकांनाही माघारी जावे लागते. मुलांना टाकेद काॕलेजला जाता येत नाही, त्यामुळे या ठिकाणी लहान पूल होणे गरजेचे आहे अशी मागणी वासाळीचे सरपंच काशिनाथ कोरडे यांनी केली आहे.

Nashik Rain Update
नाशिकच्या फुल बाजाराला बहर! गणेशोत्सवामुळे रोज लाखोंची उलाढाल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com