जुने नाशिक- रस्त्याच्या कडेस उभ्या असलेल्या १६ वर्षीय युवतीस भरधाव जात असलेल्या ट्रकने धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. सुहाना मिनहाज शेख (वय १६, रा. कोलकता, ह. रा. नागजी सिग्नल परिसर) असे मृत युवतीचे नाव आहे. अपघात झाल्यावर ट्रकसह पळ काढणाऱ्या चालकास नागरिकांनी पकडून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.