नाशिक रोड- नाशिक-पुणे महामार्गावरील शिखरेवाडी कॉर्नर येथे सोमवारी (ता. ७) सकाळी भीषण अपघात झाला. गतिरोधकावर वाहनाचा वेग कमी झाल्याने मागून भरधाव आलेल्या कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत जॉय राजेश निकाळजे (वय २५, रा. कदम डेअरी, जय भवानी रोड, नाशिक रोड) यांचा जागीच मृत्यू झाला; तर त्यांच्याबरोबर असलेली महिला जखमी झाली.