नाशिक रोड- सैन्य दलातील नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटणाऱ्या तिघा संशयित चोरट्यांना नाशिक रोड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक करत त्यांच्याकडून मोबाईल, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एक लाख पाच हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला.