Nashik Crime : सीसीटीव्हीच्या मदतीने दुचाकी चोरटा जेरबंद; ३ लाखांच्या आठ गाड्या जप्त
Serial Bike Thefts Near Nashik Road Railway Station : नाशिक रोड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारवाई करून सराईत दुचाकी चोरट्यांकडून आठ चोरीच्या गाड्या हस्तगत केल्या.
नाशिक- नाशिक रोड रेल्वे स्टेशनसह हद्दीतील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तांत्रिक तपास करीत सराईत दोघा दुचाकी चोरट्यांना सापळा रचून अटक करण्यात आली आहे. संशयितांकडून चोरीच्या ३ लाखांच्या आठ दुचाकी वाहने हस्तगत करण्यात आल्या.