Furniture Shop Fire
sakal
नाशिक रोड: येथील सुभाष रोडवरील सत्कार पॉइंट परिसरात शुक्रवारी (ता. २४) रात्री एका जुन्या फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीत दुकानातील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले असून, परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे शेजारील लाकडाची वखार आणि इतर दुकाने वाचविण्यात यश आले असून मोठा अनर्थ टळला आहे.