नाशिक रोड- आगामी कुंभमेळासाठी नासाका साखर कारखान्याची जागा शासनाने प्रस्तावित केली आहे. ही जागा जिल्हा बँकेकडे ताबेगहाण आहे. त्यामुळे कुंभमेळासाठी ही जागा हवी असल्यास तत्पूर्वी पळसे ग्रामपंचायतबरोबर भाडे पट्टा करार करुन ग्रामपंचायतीला भाडे पट्टा देण्याची मागणी पळसे गावच्या सरपंचांसह सदस्य, सर्वपक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, तहसीलदार शोभा पुजारी व जिल्हा बँक प्रशासनाला निवेदन देण्यात आला.