नाशिक रोड- आयपॅड चोरी करणाऱ्या व विकत घेणाऱ्या संशयितास अटक चार लाख तीस हजार रुपययांचा मुद्देमाल नाशिक रोड रेल्वे पोलिसांनी जप्त केला. प्रवासी दीपक चंद्रकांत सोनवणे (रा. रामानंद नगर, ता. जळगाव) हेगीतांजली एक्सप्रेस मधून कल्याण ते जळगाव असा प्रवास करत असताना नाशिक रोड रेल्वे स्टेशन येण्याच्या दहा मिनिटे अगोदर त्यांच्या बॅगमधून त्यांचे एक सॅकबॅक त्यात एक आयफोन आयपॅड व रोख रक्कम असे चोरट्याने चोरून नेले. या प्रकरणी नाशिक रोड येथे तक्रार दाखल होती.