नाशिक- शहरातील रस्त्यांचा मुद्दा विधानसभेत गाजल्यानंतर महापालिकेच्या आयुक्त मनिषा खत्री यांनी रस्त्यावर उतरून खड्डे दुरुस्ती संदर्भात पाहणी केली. आवश्यक त्या ठिकाणी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. रस्त्यांवरील खड्ड्यांचे सर्वेक्षण करून दुरुस्तीचा प्राधान्यक्रम निश्चित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.