Ring Road
sakal
नाशिक रोड: प्रस्तावित ६० मीटर रुंद रिंग रोडच्या भूसंपादनाबाबत निर्माण झालेल्या संभ्रमावर व नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी खासदार राजाभाऊ वाजे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता. ३१) महत्त्वपूर्ण बैठक झाली. बैठकीस शेतकरी, जमीनधारक, तसेच गुंठेवारी प्लॉटधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.