Nashik News : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्याचे काम निकृष्ट; ग्रामस्थांनी सुरु असलेले काम पाडले बंद

The villagers stopped the work of Vani-Dharambarda, Bhatode road complaining that it was being done poorly.
The villagers stopped the work of Vani-Dharambarda, Bhatode road complaining that it was being done poorly.esakal

वणी (जि. नाशिक) : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात येत असलेल्या वणी ते धरमबर्डा, भातोडा या चार किलोमीटर ६०० मीटरच्या रस्त्याचे काम अतिशय दर्जाहिन होत असल्याचा आरोप करीत भातोडे ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी रस्त्याची पोलखोल करीत काम बंद पाडले. (Road work under Chief Ministers Gram Sadak Yojana poor villagers stopped ongoing work nashik news)

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, नाशिक यांच्या अंतर्गत कार्यकारी अभियंता, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, नाशिक यांच्या अधिपत्याखाली वणी-धरमबर्डा, भातोडे या रस्त्याचे काम सुरू आहे.

सुमारे २० वर्षांनतर खड्डेमय असलेल्या या रस्त्याच्या कामास मोठ्या पाठपुराव्यानंतर सहा महिन्यांपूर्वी काम सुरू करण्यात आले. हे काम करणारे कंत्राटदार असलेले मे. डी. जी. चव्हाण ॲन्ड कंपनी, नाशिक यांनी रस्तावर खडीकरण करून डांबराचा अल्प वापर करुन एक लेअर पूर्ण केला.

त्यानंतर पावसाळ्यात हे काम थांबवले. त्यात पावसाळ्यात तयार केलेला हा रस्ता ठिकठिकाणी उखडला जाऊन खड्डे पडले. पंधरा दिवसांपासून या रस्त्याचे अपूर्णावस्थेत असलेले काम पुन्हा सुरू केले असून, होत रस्त्यावर दर्जाहिन डांबराचा नावालाच वापर करुन बारीक खडीचा थर देण्यात येत असल्याच्या तक्रारी भातोडे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी केल्यानंतर बुधवारी सकाळी सरपंच संगिता महाले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व रस्त्यालगतचे शेतकरी यांनी झालेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाताने उकरला जात असल्याचे दाखवत निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल केली.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

The villagers stopped the work of Vani-Dharambarda, Bhatode road complaining that it was being done poorly.
Board Exam : परीक्षार्थी विद्यार्थ्यांना घाबरवू नका; शिक्षकभारती

या वेळी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी सदरचे काम बंद पाडून सदर कामाची चौकशी करुन इस्टीमेट प्रमाणे रस्त्याचे काम न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

सरपंच संगीता महाले, उपसरपंच चंद्रकला महाले, आनंदा राऊत, दशरथ महाले, रंगनाथ चव्हाण, रोहिदास भोये, सचिन कुवर, भूषण चव्हाण, रमेश गायकवाड, नारायण पालवी, अशोक पवार, देवीदास पवार, रंगनाथ महाले, देवराम गायकवाड, जयराम जोपळे, लहु चौरे, विश्वनाथ पालवी, पंडित पालवी, कारभारी पालवी, प्रभाकर महाले, तुकाराम पवार, परशुराम पालवी, सुभाष गायकवाड, डोखळे बाबा, जोपळे बाबा, भातोडे, धरमबर्डा व वणी परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

माहिती फलकावर खर्चाची माहिती नाही

वणी ते धरमबर्डा, भातोडे या रस्त्याचे कामाच्या वर्णनाचे माहिती फलक संबंधित ठेकेदाराने या रस्त्यावर लावलेला आहे. यात रस्त्याची लांबी - ४.६०० कि.मी. दर्शविली आहे, मात्र किंमत नमूद केलेली नाही.

तसेच काम सुरू करण्याची तारीख ३ डिसेंबर २०१८ नमूद केलेली असून, काम पूर्ण करण्याचा कालावधी १२ महिने दर्शविला आहे. तसेच काम पूर्णत्वानंतर कंत्राटदारामार्फत पाच वर्षापर्यंत देखभाल व दुरुस्ती हमी असल्याचे नमूद केले आहे.

मात्र या रस्त्याचे काम नमूद तारखेनुसार चार वर्षांनंतरही पूर्ण झालेले नसल्याने, तसेच सदरचे काम कागदोपत्री पूर्ण दाखवून ठेकदाराने शासनाकडून बिल काढल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

The villagers stopped the work of Vani-Dharambarda, Bhatode road complaining that it was being done poorly.
Nashik News : अशोकस्तंभाला वाहतूक कोंडीचा विळखा; सकाळ- सायंकाळ वाहनांच्या लांबलचक रांगा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com